जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कामात वडीलांचा चांगला पाठिंबा मिळेल. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. कामाबाबतच्या चिंता दूर होतील.
वृषभ :-
आध्यात्मिक प्रगती साधता येईल. तुमच्याकडील ज्ञानाचे कौतुक केले जाईल. उपासनेत प्रगती कराल. उत्तम मानसिक शांतता लाभेल. हातातील संधी सोडू नका.
मिथुन :-
फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करून चालणार नाही. काटकसरीने वागावे लागेल. वैचारिक गोंधळ टाळावा. मोहाला बळी पडू नका. अचानक धनलाभ संभवतो.
कर्क :-
भौतिक सुखाच्या मागे लागू नका. अती अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. फसवणुकीपासून सावध रहा. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.
सिंह :-
प्रकृतीची काळजी घ्यावी. आहाराचे योग्य पथ्य पाळावे. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या इच्छेला मान द्यावा लागेल.
कन्या :-
कामात दिरंगाई जाणवू शकते. मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. सहकार्यांवर फार विसंबून राहू नका. काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी.
तूळ :-
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कमिशनमधून चांगली कमाई करता येईल. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाला आवर घालावा लागेल.
वृश्चिक :-
तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. दुचाकी वाहन जपून चालवावे.
धनू :-
आवक जावक यांचा योग्य मेळ घालावा. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.
मकर :-
सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल. तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
कुंभ :-
मानसिक चिंता बाजूला साराव्यात. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ पडेल. मनातील उदासवाणे विचार काढून टाका. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.
मीन :-
पैशाची नड भागली जाईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
हेही वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






