गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या वतीने पहिलवान व मान्यवरांच्या आ.चिमणराव पाटील यांच्याहस्ते गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न

Spread the love

प्रतिनिधी | एरंडोल

येथे गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था एरंडोल तर्फे आयोजित सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती व पत्रकार बंधू तसेच १७ कुस्तीगिरांचा गुणगौरव योगेश्वरी मराठे , प्रेरणा मराठे, प्रांजल पाटील , यामिनी आरखे , भूमिका पाटील , चेतन सोनवणे , भूषण आरखे , सुजल भोई , भावेश आरखे , साई पाटील, राम पाटील , पियुष मराठे ,कुणाल कुंभार, कल्पेश पाटील , दर्शन पाटील , नयन आरखे, लोकेश सोनवणे, रोशन पाटील गुणगौरव सोहळा संपन्न झाला गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या वतीने कुस्तीगिरांचा गुणगौरव करण्यात आला

या कार्यक्रमास एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन अँड किशोर काळकर ( समन्वय प्रदेश संघटन भाजपा प्रदेश राज्य ) तर प्रतिमा पूजन माननीय सतीश गोराडे पोलीस निरीक्षक, गणेश अहिरे सह. पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून देविदास महाजन माजी नगराध्यक्ष , प्रा. मनोज भाऊ पाटील ( जिल्हा अध्यक्ष मराठा महासंघ )राजेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष, अरुण माळी माजी तहसीलदार ,

तालुका प्रमुख रविंद्र जाधव माजी सभापती शालिकभाऊ गायकवाड, शहर प्रमुख आनंदा चौधरी चंद्रकांत महाजन, लीलाधर पाटील साहेब, राजेंद्र राघो महाजन, बबलू पैलवान माजी नगरसेवक, मनोज आनंद मराठे ,माजी नगरसेविका सरलाताई पाटील , जहीरोददीन शेख अँग्लो उर्दू हायस्कूल अध्यक्ष , आनंद दाभाडे , मयूर महाजन , जावेद मुजावर, हाजी लतीफ मिस्तरी, गोपाल शामु पाटील, सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी सर्व कार्यक्रमास उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा गुणगौरव सोहळा पार पाडला

https://www.youtube.com/@zunjaarnews

☝️☝️ वर दिलेल्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ????????????
Like share and Subscribe our youtube Channel

या वेळी आ चिमणराव पाटील म्हणाले की या महिला पहिलवान खेळाडू एरंडोल शहराचे नाव हे जिल्हा,विभाग, राज्य, व देशाच्या पातळीवर नेले आहे त्या सर्वाचे मी अभिनंदन व कौतुक करतो तसेच सर्व मुले मुली हे मोबाईल कडे जात आहेत मैदानी खेळाकडे फार कमी मुले मुली वळत आहे येणारी पुढची पिढीत ही खेळाडू बनावे म्हणून तुम्ही जागेची व्यवस्था करा मी तुम्हाला आधुनिक व आखड्याची व्यायम शाळा बाधून देतो असे सागितले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष भानुदास आरखे, उपाध्यक्ष पंकज पाटील , सचिव अनिल मराठे, खजिनदार ऋषिकेश महाजन,सदस्य अनिल आरखे, अनिल भोई, नयन आरखे, स्वप्नील बोरसे, जावेद खाटीक, संजय कुंभार ,नागराज पवार, दिलीप पैलवान, संभाजी देसले ,राजू साळी, बापू सोनार सर्व सहकारी मित्रमंडळी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले.

हे पण वाचा

टीम झुंजार