पारोळा प्रतिनिधी
पारोळा :- माहे सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२१ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत.असे असतांना माझ्या मतदार संघातील एरंडोल तालुक्यातील फक्त एकाच सर्कलला अतिवृष्टीचे अनुदान मंजूर झाले असून उर्वरित तीन सर्कलला अनुदान मंजूर नाही. तसेच पारोळा तालुक्यातील दोन सर्कलला अनुदान मंजूर करण्यात आले परंतु तीन सर्कलला अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही.
तसेच संपूर्ण एरंडोल व पारोळा तालुक्यात नुसकान झालेले असतांना व पंचनामे झालेले असूनही उर्वरित पारोळा तालुक्यातील तीन व एरंडोल तालुक्यातील तीन सर्कलला अनुदान मंजूर नसल्यामुळे तसेच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अनुदान मिळणेबाबत सातत्याने मागणी होत आहे. यासाठी उर्वरित सर्कल मधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मंजूर करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे केलेली आहे.