एरंडोल येथे जन आक्रोश /निषेध मोर्चाचे आयोजन तहसीलदार यांना देणार निवेदन

Spread the love



धरणगाव शहरात दि 20 फेब्रुवारी राजी एका 62 वर्षीय नराधमांने 6 व 8 वर्षे वयाच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. माणूस असूनही पशूपेक्षाही नीच प्रवृत्तीचा आहोत,ही दाखवणारी तितकीच समाजातील अधोगती दाखवणारी ही घटना आहे.या घटनेचा करावा तितका निषेध कमी आहे.आपल्या नातीच्या वयाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून उमलत्या वयातील या कोवळ्या कळ्या खुडून टाकणारी ही घटना आपल्या मुली बाळी सुरक्षित आहेत का ? असा विचार करायला लावणारी आहे.


आज आपल्या समाजातील चिमुरड्यांवर हा भयानक प्रसंग घडला आहे, उद्या कदाचित ही चिमुरडी आपल्या घरातील असू शकते, म्हणून या घटनेचा घरात बसून निषेध व्यक्त करून तुमची आमची जबाबदारी संपणार नाही तर एरंडोल तालुक्यातील सर्व माता बहिणींनी व नागरिकांनी पंचायत समिती एरंडोल येथे येऊन निषेध मोर्चा मध्ये सहभागी होऊन या चिमुकल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी,तसेच हा खटला जलदगतीने चालवून आरोपी नराधमांस फाशी देण्यात यावी म्हणून तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात येणार आहे असे आव्हान करण्यात आले आहे.


निवेदनामध्ये या मागण्याची मागणी करण्यात येणार आहे.

▪️अत्याचार ग्रस्त बालिकेला न्याय मिळाला पाहिजे.

▪️सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून अत्याचाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.

▪️अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत.

टीम झुंजार