भागलपूर (बिहार) :- वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रेमप्रकरणाची विचित्र प्रकरणे समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली आहे.भागलपूर जिल्ह्यामध्ये एक महिला आपल्या दिरासोबत पळून गेली आहे. महिलेचे 6 वर्षांपूर्वी लग्न झालं आणि तिला तीन मुलंही आहेत. महिलेच्या नवऱ्याचा एक अपघात झाला आणि त्यानंतर पत्नीचं वागणं बदलू लागलं.
महिलेचा पती कुद्रतुल्लाह याने दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं, लग्नाच्या तीन वर्षांपर्यंत आयुष्य आनंदात जात होते. 2021 मध्ये आंब्याच्या झाडावरून पडल्याने त्यांचे दोन्ही पाय मोडले होते. आर्थिक अडचणींमुळे योग्य उपचार होऊ शकले नाहीत. नीट उपचार न मिळाल्याने काही दिवसांनी चालायला त्रास होऊ लागला. घरची आर्थिक परिस्थितीही बिकट होत चालली होती.
दरम्यान, या काळात पत्नी आणि भावामध्ये जवळीक वाढली आणि त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. 29 मे रोजी दोघेही घरातून पळून गेले. याप्रकरणी सानोखर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण भागलपूर जिल्ह्यातील सनहौला ब्लॉकचे सांगितले जात आहे. महिलेच्या पतीने सांगितले की, गोड्डा जिल्ह्यातील (झारखंड) येथील रहिवासी असलेल्या मुलीसोबत 6 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं
पाय मोडल्यानंतरच पत्नीचं वागण बदललं होतं. भावासोबत पळून गेल्यानंतर ही महिला प्रियकरासह तिच्या माहेरी पोहोचली. माहेरी पोहोचल्यानंतर दोघांना तिथे लग्न करायचं होतं, याला गावकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






