प्रतिनिधी l पारोळा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या एकता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. डॉ व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय पारोळा या शाळेतून राज विश्वास चौधरी यांने 93.80% गुण मिळविले. तर ओम प्रदीप चौधरी याने ब.गो .शानबाग विद्यालय जळगाव या शाळेतून 88% गुण मिळविले आहेत. राज हा पत्रकार विश्वास चौधरी यांचा लहान चिरंजीव आहे.
तर ओम हा जळगाव पोलीस प्रदीप चौधरी यांचा मुलगा आहे. दरम्यान विश्वास चौधरी यांचा मोठा चिरंजीव तेजस विश्वास चौधरी याला देखील यापूर्वी इयत्ता दहावीच्या परीक्षेत 93.80 इतकेच गुण मिळाले होते. दोघा भावांना दहावीत सम समान गुण मिळण्याचा हा दुर्मिळ योगा योग या निमित्ताने समोर आला आहे. राज व ओम या दोघांचे या उत्तम यशाचे आजी, आई वडील, काका काकू, भाऊ बहिणी व शिक्षक वृंदांनी तोंड भरून कौतुक केले आहे. राज व ओम दोघ भावंडाना टीम झुंजार न्यूज कडून भावी वाटचालीस शुभेच्छा
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम