वाघाडी ते शिंगाडी रस्त्याचे काम अपूर्ण, वाहनधारकांसह शेतकरी त्रस्त.

Spread the love

रावेर प्रतिनिधी :- अनिल इंगळे.

रावेर तालुक्यातील वाघाडी ते शिंगाडी या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापूर्वी करण्यात आले परंतु संबधित ठेकेदाराने वाघाडी कडून अर्धा आणि शिंगाडी या गावाकडून अर्धा रस्त्याचे काम करण्यात आले.परंतु कमीत कमी दोन्ही गावांच्या मध्यंतरी 3 किलोमीटर रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम गेल्या वर्ष भरापासून अद्यापही अपूर्णावस्थेत आहे तसेच पडून आहे सदरील रस्त्यावर वाहन चालवताना वाहनधारकां जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागतो.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी निखळून पडल्याने दुचाकी वाहने स्लीप होत असून किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर केळी पिकांची लागवड करण्यात आली असून सध्या कापणी योग्य केळीची वाहतूक करण्यासाठी शेता पर्यंत ट्रक जात नसल्याने शेतकऱ्यांना 10 ते 15 रुपये प्रति झाड या प्रमाणे केळी कामगार मजुरांमार्फत केळीची वाहतूक करावी लागत असल्याने आर्थिक भृदंड बसत आहे .बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देवून सदरील रस्त्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांसह वाहनधारकांनी केली आहे.

https://www.youtube.com/@zunjaarnews

☝️☝️ वर दिलेल्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ????????????
Like share and Subscribe our youtube Channel

हे पण वाचा

टीम झुंजार