Viral Video: सध्या सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयानक अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जो पाहून भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. अनेकदा या अपघातांमध्ये चूक नसतानाही नाहक एखाद्याला शिक्षा भोगावी लागते.
सध्या अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.. सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी भितीने गाळणही उडते. यामध्ये अनेक व्हिडिओ हे अपघाताचे असतात. सध्या अशाच एका विचित्र अपघाताच्या व्हिडिओने लक्ष वेधले आहे, ज्यामधील तरुणाला त्याची कसलीही चूक नसताना शिक्षा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
हा तरुण त्याच्या गाडीवरुन येतो. एका दुकानासमोर गाडी थांबवून त्यावरुन तो उतरताच थेट गायब झाल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे. हा विचित्र अपघात पाहून नेटकरीही चक्रावले आहेत.मात्र, हा अपघात म्हणजे काही चमत्कार नाही तर एक छोट्याशा चुकीची या तरुणाला शिक्षा मिळाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ निट पाहिला तर लक्षात येते की, त्या वक्तीने एका झाकणावर गाडी लावली, आणि वजन जास्त झाल्याने त्या झाकणासह खड्ड्यात पडला.
यानतंर आजुबाजूचे लोक त्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. दरम्यान ही सर्व घटना सिसिटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. यामध्ये दिसत आहे, तो व्यक्ती खड्ड्यात पडला मात्र बाईक तशीचवर अडकून राहिली आहे. सुदैवाने यामध्ये व्यक्तीला गंभीर दुखापत झालेली नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






