प्रेयसीने लग्नाचे वचन देऊन सहा महिने संबंध ठेवले, आता मला जीव देण्यासाठी सांगत आहे अशी सुसाईड नोट लिहून बी. फार्माच्या विद्यार्थ्याची आत्महत्या.

Spread the love

कौशांबी :- प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून कौशांबी जिल्ह्यात बी.फार्माच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह घरातील एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. तसेच त्याच्या खिशातून सुसाईड नोटही सापडली आहे.
त्याव्यतिरिक्त या तरूणाने आपले जिवन संपविण्याआधी फेसबूक वर एक पोस्ट शेअर करत त्याच्या गर्लफ्रेंडला जबाबदार धरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सदर घटना मोहब्बतपूर पोलिस ठाणा हद्दीतील कैमा गावातील आहे. मृत तरूणाचे वडिल छोटे लाल यादव हे व्यवसायाने शेतकरी आहेच. छोटे लाल यांना दोन मुले व एक मुलगी अशी अपत्ये होती. मोठा मुलगा दिल्लीत राहतो. तर वर्षभरापूर्वीचं मुलीचे लग्न झाले. तर लहान मुलगा राहुल यादव (22) हा सिरथू येथील एका महाविद्यालयात बी. फार्माच्या शेवटच्या परिक्षेची तयारी करत होता.शनिवारी सकाळी अचानक राहुल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तसेच त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळली.

या चिठ्ठीमध्ये मी राहुल यादव नाईलाजास्तव आत्महत्या करत आहे, मला लग्नाचे वचन देऊन सहा महिने माझ्यासोबत संबंध ठेवले, आणि आता मला जीव देण्यासाठी सांगत आहे. गेले अनेक महिने मी मानसिक तणावाखाली जगत आहे. पण आता हा त्रास माझ्याने सहन होत नाही. या मुलीने माझे आयुष्य खराब केले आहे, आणि हिला कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी. या मुलीमुळे माझे कुटुंब माझ्यापासून दुरावले आहे. नेहमी मुलांची चूक असते असे नाही. या मुलीने माझा छळ केला आहे, व हा छळ सहन न झाल्याने मी हे पाऊल उचलत आहे.

असे या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.
या चिठ्ठी व्यतिरिक्त आत्महत्येपूर्वी आठ तास आधी राहुलने त्याच्या फेसबूक अकाउंट वरून प्रेयसीसोबत फोटो व त्याखाली हिनेच माझे आयुष्य उद्धस्त केले आहे, असे कॅप्शन देखील लिहिले आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल कोरोना दरम्यान एका आरोग्य केंद्रात कोविड ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याचवेळी त्याची ओळख ANM (राहूलची प्रेयसी) सोबत झाली. त्यानंतर जवळपास 3 वर्षे त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते.

हे पण वाचा

टीम झुंजार