पाऊस, वादळी वाऱ्यामुळे मयत झालेल्या पशुधन मालक शेतकऱ्यांना आ.चिमणराव पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप.

Spread the love

पारोळा :- तालुक्यात माहे एप्रिल २०२३ मध्ये वादळी वारा व पावसामुळे टिटवी व म्हसवे येथील शेतकऱ्यांचे पशुधन मयत झाले होते. संबंधित शेतकऱ्यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचेकडे नुकसान भरपाई मिळणेसाठी मागणी केली होती. याची आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करून प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचा सुचना दिल्या होत्या.

त्याचा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी योग्य तो पाठपुरावा करून आज संबंधित शेतकऱ्यांना पशुधनाच्या नुकसानीचा अर्थसहाय्याचा धनादेश आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार डाॕ.उल्हास देवरे, म्हसवे मा.उपसरपंच साहेबराव पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, शुभम बोरसे, संदीप पवार यांचेसह पशुधन धारक शेतकरी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार