एरंडोल :- शासनाने सुरु केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत समावेश असलेल्या सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा अशा सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी शासकीय अधिकारी व विभागप्रमुख यांच्या आढावा बैठकीत केल्या.पंचायत समिती सभागृहात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याबाबत नियोजन करण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी व विभागप्रमुख
यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.आमदार चिमणराव पाटील अध्यक्षस्थानी होते.
बैठकीत सर्व शासकीय योजनांची माहिती
लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सुचना केली.शासनाने पात्र लाभार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासठी सदर योजना सुरु केली असून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.सर्व अधिकारी
व कर्मचा-यांनी सदर योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे,जे अधिकारी व कर्मचारी हलगर्जीपणा करतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा दिला. तालुक्यात मंजूर झालेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिली.
प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासकीय योजनांशी निगडीत विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी यांनी उपक्रम यशस्वी करावे असे सांगितले. योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे,लाभार्थ्यांची यादी करणे,त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे याबाबतची
कार्यवाही करण्याचे सांगितले.तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी तहसीलदार कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या विविध शासकीय योजनांची माहिती बैठकीत
दिली.
तसेंच तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व विभागप्रमुख यांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध शासकीय योजनांची माहिती बैठकीत
सादर केली.तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.बैठकीस पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे,गटविकास अधिकारी दादासाहेब जाधव,शिवसेनेचे तालुकासंघटक संभाजी चव्हाण,अंतुर्लीचे उपसरपंच गौरव पाटील यांचेसह सर्व विभागांचे शासकीय अधिकारी,विभागप्रमुख कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






