ग्रेडेड मुख्याध्यापक बाळू जगन्नाथ मोरे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त

Spread the love

पिंप्री खु – प्रतिनिधी / सतिष शिंदे सर

पिंप्री खु :- येथील रहिवासी असलेले तसेच सदोतिस वर्षे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक कस्ट करत आपला ठसा उमटवणारे ग्रेडेड मुख्याध्यापक बाळू जगन्नाथ मोरे हे भवरखेडा ता धरणगाव येथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले .

असा झाला शिक्षण प्रवास …

बाळू मोरे सर यांचा शैक्षणिक प्रवास हनुमंतखेडा ता धरणगाव , कंडारी ता धरणगाव , बांभोरी प्र चा . ता धरणगाव ,शिरसोली ता जळगांव , नांद्रा ता जळगाव , पाळधी फुलेनगर ता धरणगाव , इथपर्यंत पदवीधर शिक्षक व जि प उच्च प्राथमिक शाळा भवरखेडा ता धरणगाव येथे ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त 31 मे 2023 झाले.

त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात पाळधी गटाचे जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील ,पिंप्री गटाचे गोपाळ चौधरी , माजी शिक्षण सभापती पी सी पाटील ,डॉ सिद्धार्थ निकम , विश्वासराव मोरे , भारत मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य महासचिव मोहन शिंदे , डॉ गोपाळ पाटील , मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव , पिंप्री गावाचे सरपंच सौ सरला बडगुजर , उपसरपंच मंगल पाटील , केंद्र प्रमुख प्रमोद पाटील सर , शरद पाटील मा . संचालक ग स , जळगाव तसेच बहुसंख्य जेस्ट शिक्षक वृंद उपस्थित होते .

तसेच त्यांचा बहुसंख्य मित्र परिवार , नातेवाईक , जावई , भाऊ , पुतणे , सर्व नातेवाईक, विद्यार्थी , विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला. समारंभ चे सूत्रसंचालन व आभार आदर्श प्राथमिक शाळेचे उपशिक्षक सतिष शिंदे यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार