क्रूरतेचा कळस! लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने, प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले.

Spread the love

मुंबई :- दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड सारखीच एक धक्कादायक घटना मुंबईमधून समोर आली आहे. मुंबईत एका 56 वर्षीय व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आणि नंतर करवतीने त्या मृतदेहाचे तुकडे केले.एवढेच नाही तर परिसरातील कोणालाही संशय येऊ नये आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून तो एक एक करून मृतदेह फेकत राहिला.

या सरस्वती वैद्य हत्या प्रकरणाने मुंबईसह देशभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 56 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर मनोज साहनी याने 32 वर्षीय सरस्वतीची ज्या पद्धतीने हत्या केली आणि तिच्या शरीरावर केलेल्या क्रूरतेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मनोज साहनी याने सरस्वतीची गळा चिरून हत्या केली आणि नंतर करवतीने तिचे तुकडे केले, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

एवढेच नाही तर हे तुकडे तो कुकरमध्ये उकळून कुत्र्यांना खाऊ घालत होता. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहचलेआरोपी मनोज साहनी दरवाजा उघडताच तो पळू लागला. पोलिसांनी त्याला पकडले आणि आत डोकावून पाहिले असता त्यांना मृतदेह सापडला. पोलिसांचे सांगितले की, ही हत्या 4 जून रोजीच झाली असावी आणि त्यानंतर मनोज मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करत होता.

आरोपीने सांगितले की, तो मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळून कुत्र्यांना खाऊ घालत असे. आरोपी मनोज साहनी हा गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांना काही तरी खाऊ घालत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. हे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असल्यानं संशय बळावला. खोलीच्या आतून सरस्वतीच्या शरीराचा फक्त खालचा भाग सापडला आहेया घटनेनंतर नयानगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मीरा रोड येथील गीता नगर कॉलनीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना घडलेल्या इमारतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी आतापर्यंत सरस्वतीच्या मृतदेहाचे १३ तुकडे जप्त केल्याचे बोलले जात आहे.

मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे एकूण 20 तुकडे केले. दोघेही गीता नगरमध्ये तीन वर्षांपासून राहत होते आणि ते कोणाशीही फारसे बोलत नव्हते. मात्र, याआधी त्यांच्यात भांडण झाल्याचेही कोणी ऐकले नव्हते
कुत्र्यांना कधीच काही खायला दिले नाही, तीन दिवस त्यांची कृती पाहून संशय बळावला………

स्थानिक लोकांनी सांगितले की, आरोपी मनोज कधीच कुत्र्यांना काही खाऊ घालत नव्हता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तो कुत्र्यांना काहीतरी खायला घालताना दिसत होता. दिवसातून अनेकवेळा तो कुत्र्यांना खायला घालायचा. त्यामुळे त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

एवढेच नाही तर दुर्गंधी येऊ नये आणि कुत्रे सहज खाऊ शकतील यासाठी तो मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळत असे. या घटनेने दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची आठवण करून दिली आहे, जिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने तिचे 32 तुकडे करून जंगलात फेकले होते
मनोज सानेला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी…..
मनोज साने याला पोलिसांनी अटक केली आहे. आज ठाणे सत्र न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी बरीच माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.

टीम झुंजार