Viral Video : काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाचा ट्रेंड पाश्चात्य देशांमधून आता भारतात दिसून येतं आहे. या अशा नात्यांमुळे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधावरील विश्वास उडताना दिसत आहे.
नातं हे विश्वास आणि प्रेमावर असतं पण जेव्हा दोघात तिसरा येतो तेव्हा त्या नात्याला तडा जातो. भारतात आजही महिलांना आपल्या नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला दुसऱ्या स्त्रीसोबत शेअर करु शकतं नाही. त्यात जर तिला कळलं आपल्या नवऱ्याची दुसरी बायको आहे? पुढे काय घडणार त्याचा अंदाज प्रत्येकाला आहे.
माझ्या नवऱ्याची दुसरी बायको!
सोशल मीडियावर नवरा बायकोचा एक व्हिडीओ तुफान ट्रेंडिंगमध्ये आहे. तिचा नवरा दुसऱ्या बायकोसोबत दिसल्यानंतर पहिल्या बायकोने पाहिलं अन् मग भररस्त्यात महाभारत घडला.
नेमकं काय घडलं?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती एका महिलेसोबत उभा आहे. त्याचा दिशेने एक महिला मोठ्या तावाताव येत आणि त्याचा कानशिलात देते. हे पाहून दुसरी बायको पतीच्या बचावासाठी पुढे येते.
महाकालीचं अवतार घेऊन आलेली पहिली बायको तिला बाजूला जायला सांगते आणि परत त्याचा अंगावर धावून जाते. नवरा राहतो बाजूला पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये आखाडा रंगतो. एकमेकांची केस उपट त्या मारहाण करतात. नवरा त्या दोघींना थांबायला जातो. त्या एकमेकींना मारत सुटतात.
अशावेळी पहिल्या पत्नीच्या मदतीला एक महिला हातात बॉटल घेऊन येते. ती महिला दुसऱ्या पत्नीचे केस ओढत तिला बॉटलने मारहाण करते. कसंबसं त्यांना सोडविण्यात आल्यानंतर पहिली बायको नवऱ्याला मारायला लागते. एवढंच नाही तर चप्पल घेऊन ती मारायला येते तर नवराही पायातील चप्पल काढून मारायला लागतो. पुढच्या सेकंदला नवरा दुसऱ्या बायकोला घेऊन पळ काढतो.
क्षणात व्हिडीओ व्हायरल
तिथे असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ ट्विटरवर प्रकाश कुमार यांनी पोस्ट केला आहे.
कुठली आहे घटना?
ही घटना बिहारच्या नालंदामधील घडलेली आहे. या व्हिडीओमागील सत्यता अजून समोर आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार नवरा बायकोमधील हे भांडण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






