प्रतिनिधी | अमळनेर
येथून जवळच असलेल्या वासरे येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने अमरधाममध्ये निंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना दिनांक ९ राजी दुपारी उघडकीस आली , गेल्या वर्षी एकुलता एक मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता तेव्हा पासून मुलगा गमावल्याचे दुःखाच्या विवंचनेतून आत्महत्या केल्याचे बोलते जाते , भागवत प्रकाश पाटील वय ५० असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाडळसरे येथून जवळच असलेल्या वासरे येथील भागवत प्रकाश पाटील (वय ५०) यांनी दिनांक ९ रोजी सकाळी पत्नीला शेतात जाऊन येतो म्हणून सांगून घराबाहेर पडले व गावाबाहेरील अमरधाम (स्मशानभूमीत )जवळील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. सदर घटना दुपारी शेतातून घरी परत येणाऱ्या शेतकऱ्यांना कोणीतरी निंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत भागवत पाटील यांनी आत्महत्या केल्याचे दिसले , लागलीच गावातून खाजगी वाहन आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत भागवत पाटील यांच्याकडे दोन बिघे कोरडवाहू शेती असून त्याच्यावरच त्यांचा व पत्नीचा उदरनिर्वाह सुरू होता. त्याच्या मुलाचा एक वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता व एकुलता एक मुलगा गमावल्याची भावना त्यांनी मित्रांकडे बोलून दाखवली होती ,त्या विवंचनेतून भागवत पाटील यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते ,एक मुलगी व मुलगा असे अपत्य होते त्यात मुलीचे लग्न झाले असून त्यांच्या पश्चात आता पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले ,याबाबत मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा