Viral Video: बिहारमधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीचे कुटुंबीय तिला तिच्या सासरच्या घरातून बळजबरी बाईकवरून घेऊन जाताना दिसत आहे. तर हे प्रकरण प्रेमविवाहाशी सबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मुलीच्या सासरच्यां लोकांनी तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुलीच्या घरचे तिने मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे नाराज होते. त्यामुळे त्यांनी अचानक मुलीच्या सासरच्या घरी जाऊन मुलीला बाईकवरुन बळजबरी उचलून आणलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण मुलीला बाईकवर बळजबरी लटकवून घेऊन जात असल्याचे
स्पष्ट दिसत आहे. यावेळी ती मुलगी जोरजोरात ओरडत आणि रडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर यावेळी गावातील अनेक लोक ही घटना पाहात उभे असल्याचं दिसत आहे.
पीडित मुलीच्या सासरच्या लोकांनी ऑनर किलिंग अंतर्गत मुलासह सूनेची हत्या करण्याची भीती व्यक्त करत गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे, फारबिसगंज एसडीपीओ खुशरू सिराज आणि पोलीस कर्मचारी नंदकिशोर नंदन यांनी तातडीने कारवाई करत मुलीला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याआधीही मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या वडिलांना मारहाण केली होती. ज्यामध्ये मुलाच्या वडिलांचा एक हात तुटला होता. त्यावेळीही मुलीच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा