चाळीसगाव शहरवासीयांनो आपल्या आशिर्वादाने आमदारकी ची संधी मिळाली, तिचे चीज करण्यासाठी जबाबदारीचे भान आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण ठेवूनच गेली अडीच वर्षे लोक प्रतिनिधी म्हणून कर्तव्य बजावत आलो आहे. कोरोना महामारी असो व महापूर असो सातत्याने लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव शहर वासीयांना त्रासदायक ठरणाऱ्या खराब रस्त्यांच्या प्रश्नावर नगरपालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदार यांच्यात समन्वय घडवून आणत शहरातील ५ प्रमुख रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे व त्याचे कार्यारंभ आदेश देखील मिळविले आहेत.सर्वाधिक रहदारी व वापर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतचा स्टेशन रोड दुरुस्तीसाठी देखील माझ्या आमदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या सर्व प्रमुख ६ रस्ते विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दि.२६ फेब्रुवारी रोजी आयोजित केला असून त्यानिमित्ताने माझ्या आमदार निधीतून शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण देखील करण्यात येणार ती कामे पुढीलप्रमाणे…
१ – गणेश रोड ते छ.शिवाजी चौक पर्यंतचा रस्ता डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – १२.९५ लक्ष
२ – कॅप्टन कॉर्नर ते गणेश रोड पर्यंतचा डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – ११.७८ लक्ष
३ – आमदार निधीतून भोले मेन्स पार्लर ते शिंदे हॉस्पिटल मिलगेट पर्यंत आरसीसी गटार बांधकाम उद्घाटन किंमत – ६ लक्ष
४ – भडगाव रोड कॅप्टन कॉर्नर ते घाटे पेट्रोल पंप पर्यंतचा डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – १९.४३ लक्ष
५ – हिरापूर रोड नवजीवन मॉल ते तिरंगा पूल रिंग रोड पर्यंतचा डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – २९.४८ लक्ष
६ – आमदार निधीतून चौधरी वाडा येथील श्री.संत संताजी जगनाडे महाराज प्रवेशद्वार भूमिपूजन किंमत – १० लक्ष
७ – आमदार निधीतून प्रभाग क्र.५ मधील चौधरी वाडा एकदंत चौक (महादेव मंदिर) जवळील चौक सुशोभीकरण करणे- भूमिपूजन किंमत – ४ लक्ष
८ – आमदार निधीतून बँक ऑफ बडोदा समोरील धोकेदायक ४० वर्ष जुन्या अंडर ग्राउंड गटार दुरुस्ती कामाचे उद्घाटन किंमत – ७ लक्ष
९ – आमदार निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतचा डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – ३० लक्ष
१० – अंधशाळा ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, तहसिल कार्यालय पर्यंतचा रस्ता डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – १४.३ लक्ष
११ – आमदार निधीतून तहसिल कार्यालय – पोलीस स्टेशन जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक सुशोभीकरण लोकार्पण किंमत – १६ लक्ष
तरी आपण सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती.!!!
आपलाच,
- आमदार मंगेश रमेश चव्हाण