जामनेर :- तालुक्यातील एकाच गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. या संदर्भात पहुर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुली शेजारी शेजारी राहतात. दरम्यान गावातील राहणारा तुषार अलाउद्दीन तडवी याने या दोन्ही मुलींना काहीतरी फूस लावून अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली.
हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या कुठेही मिळून आल्या नाही, अखेर शनिवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी तुषार अल्लाउद्दीन तडवी याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






