एरंडोल :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील एका घरातील कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून खून केल्याचा धक्कादायक घटना गांधीपुरा परिसरात दुपारी घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली आहे. हर्षदा किरण मराठे (वय-२७, गांधी पूरा, वखारीजवळ) असे मयत विवाहितेचे नाव असून तर संशयित पती किरण महादू मराठे (वय-३५) यास एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पती पत्नीच्या वादातून हत्या :
याबाबत अधिक असे की, हर्षदा मराठे या महिला पती किरण महादू मराठे यांच्यासह शहरातील गांधी पुरा भागात वास्तव्याला होत्या. गेल्या काही दिवसांपासून मराठे दाम्प्त्यामुळे कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता वाद उफाळून आलार. यात सतांपाच्या भरात पती किरण मराठे याने पत्नी हर्षदा मराठे यांच्या डोक्यात घरातील फरशी डोक्यात मारली. यात विवाहिता गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीष गोराडे यांनी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयित आरोपी पती किरण मराठे याला ताब्यात घेतले असून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






