जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. जोडीदाराबाबत समाधानी असाल. सामुदायिक बाबींचा फार विचार करू नका. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ :-
नोकरी संदर्भातील प्रस्ताव लक्षात घ्या. कौटुंबिक गोडी वाढवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. जमिनीच्या कामात अधिक वेळ जाईल.
मिथुन :-
दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. आपल्या मतावर ठाम राहाल. सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.
कर्क :-
कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्यात. अति हट्ट बरा नाही. वैचारिक स्थिरता जपावी.
सिंह :-
नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. जवळचा प्रवास कराल. भावंडांशी संबंध सुधारतील. आवडता छंद जोपासाल. कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कन्या :-
आध्यात्मिक गोष्टींकडे मन वळवा. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. सरकारी कामांना गती येईल. विशाल दृष्टीकोन बाळगाल. जोडीदाराशी खटके उडू शकतात.
तूळ :-
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील. तुमच्यातील खेळकरपणा वाढेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष घाला. इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल.
वृश्चिक :-
मानसिक चंचलता जाणवेल. अतिविचार करण्यात वेळ वाया जाईल. भागीदारीत गुंतवणूक कराल. योग्य ठोकताळ्याचा वापर करावा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
धनू :-
संघर्षमय स्थिती टाळावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. पारंपरिक कामातून यश मिळेल. व्यावसायिक अडचणींकडे अधिक लक्ष द्या.
मकर :-
कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रतिष्ठा लाभेल. तब्येतीची काळजी घ्यावी.
कुंभ :-
समजूतदारपणे विचार करावा. बोलतांना सारासार गोष्टी लक्षात घ्याव्यात. आवश्यकता असेल तरच खर्च करावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरासाठी नवीन खरेदी कराल.
मीन :-
निर्णयावर ठाम राहावे. संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या. नसत्या गोष्टींच्या मागे लागू नका. गप्पा गोष्टींची आवड पूर्ण होईल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






