पारोळा l प्रतिनिधी
येथील पोलीस स्टेशन मध्ये आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी या सणांच्या अनुषंगाने कुरेशी/खाटीक समाजाची व मस्जिद प्रमुख,मौलाना यांची बैठक घेण्यात आली.बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने कुर्बानी देणार नाही असा आदर्श निर्णय मुस्लिम बांधवांनी बैठकीत घेतला.
कोणत्याही घटनांमुळे सामाजिक धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे कुठलेही गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्यास सक्त मनाई असुन कोणीही कोणत्याही समाजाच्या/ धर्माच्या भावना दुखावतील असे कॄत्य करणार नाही याबाबत पोलिसांनी सूचना दिल्या. यावेळी कुरेशी,मौलाना व प्रतिष्ठीत मुस्लिम मान्यवरांनी बकरी ईदचे दिवशी हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशी येत असलेने कुर्बानी देण्यात येणार नाही असे आश्वासन दिले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शमशोद्दीन मौलाना, अजीज मोहम्मद मन्सुरी, शेख जुबेर शेख गफ्फार, शेख नुरुद्दीन शेख अल्लाउद्दीन, सिकंदरखान बाबेखान पठाण, मोहम्मद पठाण, मौलाना युसूफ नुरमोहम्मद, हाजी युसुफ, जुबेर अहमद शेख मोहम्मद खाटीक आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम