मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
बुधवार, दि. २८ जून २०२३
मंत्रिमंडळ निर्णय :
संक्षिप्त
जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मंत्रीमंडळाची मान्यता
- वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
(सार्वजनिक बांधकाम) - एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव
( नगर विकास विभाग) - राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटीस मान्यता
( सार्वजनिक आरोग्य विभाग )
• भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ
(जलसंपदा विभाग )
• महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित.२ कोटी कार्ड्स वाटणार
आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
(सार्वजनिक आरोग्य विभाग)
• संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ
(सामाजिक न्याय्य व विशेष सहाय विभाग)
• आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ.
करोडो कामगारांना लाभ मिळणार
(कामगार विभाग)
• नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)
- मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.
( सामान्य प्रशासन विभाग) - पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
( जलसंपदा विभाग)
• मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड
(महसूल विभाग)
• भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
(महसूल विभाग)
• मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
(विधी व न्याय विभाग)
• राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
• सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन
पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार
(वित्त विभाग)
• बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
(गृहनिर्माण विभाग)
- जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता
(परिवहन विभाग) - राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता
( वैद्यकीय शिक्षण विभाग)
• बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
(कृषि विभाग)
• दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार (नगरविकास विभाग)
- दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ
( शालेय शिक्षण)
*देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
( मृद व जलसंधारण)
- चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
( कृषी विभाग) - सर जे जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग) - गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
( जलसंपदा विभाग)
*ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
(ग्रामविकास विभाग)
- पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
( मत्स्य व्यवसाय विभाग)
• पर्यटन उपविभागासाठी उप सचिव
(पर्यटन विभाग)
हे पण वाचा
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.