प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथे जळगांव जिल्हाचे मा पालकमंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवाब मलिक विरोधात केंद्रीय यंत्रणेचा सूडबुद्धीने वापर करणाऱ्या केंद्र शासनाचा एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर निषेध करुन निवेदन देण्यात आले.
आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुचिता चव्हाण तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी एरंडोल यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य यांना ई डी ने कुठलीही नोटीस न देता चौकशीला बोलाविले आणि खोटे आरोप त्यांच्यावर करण्यात
आले तसेच केंद्रातील भाजप सरकार महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणेचा सूडबुद्धीने वापर करत आहे आणि त्यांची प्रतिमा मालिन करत आहे राजकिय फायद्यासाठी शासकीय केंद्रीय यंत्रणेचा वापर होत असल्याने या घटनेचा जाहीर निषेध एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत आहे.
निषेध मोर्चा व निवेदन देण्यासासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हासरचिटणीस मा डॉ राजेंद्र देसले राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रा मनोज पाटील पहेलवान राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष व नगरसेवक अभिजीत पाटील अशोक पाटील कासोदा राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अँड अहमद सय्यद राष्ट्रवादी महिला कॉग्रेस तालुकाध्यक्ष मंजुषा देसले ,जिल्हासरचिटणीस राजेंद्र शिंदे
राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष बबलु पहेलवान राष्ट्रवादी युवक कॉग्रेस तालुकाध्यक्ष कपील पवार जिल्हासरचिटणी उमेश देसले शहराध्यक्ष दिपक महाजन जिल्हाउपाध्यक्ष संदीप वाघ राष्ट्रवादी महिला कॉग्रेस शहराध्यक्ष व नगरसेविका वर्षा शिंदे भगतसिंग पाटील राष्ट्रवादी आडगांव गणप्रमुख अनिल पाटील
राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हाउपाध्यक्ष नरेश भोई,धिरज पाटील,ग्रा पं सदस्य आडगांव एकनाथ पाटील खडके बु सरपंच दिनेश पवार खेडगांव तांडा तसेच सर्व फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.