भडगाव :- भारत-बांगलादेश सीमेजवळ पश्र्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे दि.२७ देशसेवा बजावत असताना गुढे. ता. भडगाव. जि. जळगाव येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत असलेले जवान राहुल श्रावण माळी (३४) हे शहीद झाले आहेत.
त्यांच्या आकस्मित दु:खद निधनाने माळी परिवारावर मोठा आघात झाला असून यामुळे गावावर शोककळा पसरल्याने गुढे गावासह परिसरात या वीर शहीद जवानाबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे.
त्यांचे पार्थिव शरीर ताब्यात घेण्यासाठी त्यांचे मोठे भाऊ अविनाश माळी हे कलकत्ता येथे रवाना झाले असून त्यांचे शुक्रवारी सायंकाळ पर्यंत गुढे या मुळ गावी येण्याची शक्यता आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान चिरंजीव राहुल श्रावण माळी हे १४ वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. ते आता पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे नायक पदावर सेवा बजावत असताना दि.२७ रोजी रात्री शहिद झाले. ते कुंटुबासह आर्मी सेंटर मध्ये वास्तव्यास होते.
बराकपूर येथील आर्मी हॉस्पीटल येथे आज शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव शरीर आज नातेवाईक यांच्या ताब्यात दिल्यानंतर ते गुढे येथे शुक्रवारी सकाळी 9:00 वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, शिव वय वर्ष ४ व शंभु वय दीड वर्ष अशी लहान चिमुकले मुले आहेत.
वडील, आई व दोन मोठे भाऊ वहिनी, पुतणे असा परिवार असून ते प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे लहान बंधू आहेत. त्यांचा शासकीय इंतमात गुढे जुवार्डी फाट्यवर मोठ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यासाठी ग्रामस्थ व मित्र परिवाराने तयारी सुरु केली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






