पारोळा l प्रतिनिधी
पारोळा – सदर बाबतीत वृत्त असे की, सात बारा उताऱ्यावर कर्जाच्या बोझ्याची नोंद करण्या साठी हिरापुर येथील तलाठी राकेश भगवान काळमेख यांनी एक हजार रुपयाची लाच मागितली म्हणून अँटी करप्शन ब्यूरो नाशिक येथे दिनांक 19/6/2015रोजी तक्रारदार शांताराम नामदेव पाटील यांनी तक्रार दिली होती.
नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने तलाठी काळमेख यांना एक हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते.पोलिस निरीक्षक माधवी चौधरी यांचे फिर्यादी वरून तलाठी काळमेख यांचे विरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला भाग 6 गु. र. न.3062/2015 ला.लू.प्र. कायदा कलम 7,13(1)(ड) ,13(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन तलाठी काळमेख यांचे विरुद्ध अमळनेर सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते.
अमळनेर सत्र न्यायालयाचे न्यायधीश श्री. पी. आर. चौधरी यांचे पुढे सदर खटल्याचे काम चालले. आरोपी तर्फे पारोळा येथील विधितज्ञ ॲडव्होकेट उज्वल बी.मिसर व ॲडव्होकेट सिध्दांत मिसर् अशांनी कामकाज बघितले. सरकार पक्षातर्फे एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. चौकशी अंती आरोपी राकेश भगवान काळमेख यांचे विरूद्ध गुन्हा सिध्द होऊ न शकल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






