प्रतिनिधी l पाचोरा
पाचोरा :- शहरातील वरखेडी रोडजवळील भैरवनाथ नगरात रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी सर्पदंश झाल्याने ६६ वर्षं वयाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर नाईक हे करीत आहेत,
भैरवनाथ नगरात तुळसाबाई विठ्ठल भोसले ह्या बुधवारी रात्री आडेआठ वाजता जेवण आटोपून भांडी घासत असतांना त्यांना विषारी सापाने चावा घेतला काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला,मयत तुळसाबाई विठ्ठल भोसले यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे यांनी केल्यानंतर ऐन आषाढीच्या दिवशी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पाच्छात दोन मुले आहेत.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम