जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल. व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होऊ लागतील. मात्र कोणतेही मोठे निर्णय तूर्तास घेऊ नयेत. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. सामाजिक गोष्टींचे भान राखावे.
वृषभ :-
उगाचच शब्दांचा अतिवापर करू नका. संयम टिकवून ठेवावा लागेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.
मिथुन :-
अघळ-पघळ बोलणे टाळावे. मुद्यांपासून दूर जाऊ नका. गरज भासल्यास थोडी माघार घेण्यास हरकत नाही. कामाचा ताण जाणवेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.
कर्क :-
नियम व अटींचे पालन करावे. व्यावसायिक अनुकूलता मिळेल. इतरांचा विचार आधी करावा लागेल. हातातील कामात यश येईल. प्रवासात सतर्क राहावे लागेल.
सिंह :-
तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल. अनुकूलतेसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. औद्योगिक प्रतिष्ठा जपाल. अतिविचार करण्यात वेळ वाया जाईल. नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे.
कन्या :-
रहाणीमान सुधारण्यास वाव आहे. भागीदारीत चांगला लाभ होईल. अपेक्षित लाभाने खुश व्हाल. पत्नीची कामात उत्तम साथ मिळेल. उगाच गैरसमजाला खतपाणी घालू नका.
तूळ :-
हातातील कामांना गती येईल. कमतरता भरून निघण्यास सुरुवात होईल. नसते साहस करताना सारासार विचार करावा. पैज जिंकण्याचा अट्टाहास करू नका. स्वत:चे खरे करायला जाल.
वृश्चिक :-
नवीन प्रश्न मार्गी लावाल. आर्थिक जुळवाजुळव करावी लागेल. आव्हाने पेलायला बळ मिळेल. कामातून इच्छित ध्येय साध्य करता येईल. मनातील शंका-कुशंका संपतील.
धनू :-
प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. वरिष्ठांशी तेढ वाढवू नका. प्रामाणिक मार्ग स्वीकारा. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा.
मकर :-
नवीन जोमाने कामे करा. कामाची थोडीफार धांदल राहील. भावंडांशी मतभेद वाढवू नका. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. पारमार्थिक क्षेत्रातील लोकांची भेटीचा योग येईल.
कुंभ :-
कामाचा आवाका लक्षात घ्यावा लागेल. योग्य नियोजनावर भर द्यावा लागेल. नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल. कौटुंबिक बाबी शांततेने हाताळाव्यात. काही अनपेक्षित जबाबदार्या येऊ शकतात.
मीन :-
तांत्रिक बाबी जाणून घ्याव्या लागतील. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतील. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. लहान-सहान गोष्टी मनावर घेऊ नका. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.
हेही वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






