जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
कामात जैसे थे परिस्थिती राहील. काही जबाबदार्या नव्याने वाढतील. आवडी निवडीबाबत आग्रही राहाल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. चटपटीत पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल.
वृषभ :-
सर्वांशी तोंडात साखर ठेवून वागाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चारचौघांत मिळून मिसळून वागाल. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. हौस पूर्ण करून घ्याल.
मिथुन :-
वरिष्ठांच्या सल्ल्याने तजवीज करावी. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. तसेच काही खर्च देखील वाढतील. मानसिक दोलायमानता दूर करावी. कामाचे नियोजन यशस्वी होईल.
कर्क :-
कामाचा आवाका लक्षात घ्या. क्षुल्लक गोष्टींमुळे कामे रेंगाळू शकतात. अडथळ्यातून प्रयत्नाने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होईल.
सिंह :-
तरूणांशी मैत्री वाढेल. त्यांचे नवीन विचार जाणून घ्याल. बरेच दिवसा नंतर जुने मित्र भेटतील. कमिशनमधून चांगला लाभ उठवाल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.
कन्या :-
एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. चारचौघांसमोर तुमची कला सादर करता येईल. मुलांकडून गोड बातम्या मिळतील.
तूळ :-
कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीकडून मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मोठ्या लोकांची ओळख होईल.
वृश्चिक :-
जुने प्रश्न मार्गी लावाल. कामाचा ताण वाढू शकतो. वडीलधार्यांचा विरोध सहन करावा लागेल. मनातील निराशा झटकून टाका. जुन्या मित्रांशी संपर्क साधता येईल.
धनू :-
सामाजिक गोष्टींचे भान राखावे लागेल. प्रामाणिक प्रयत्नांना आपलेसे कराल. फटकळपणे बोलणे टाळा. वाईट संगतीचा मार्ग स्वीकारू नका. पत्नीशी मतभेद होण्याची शक्यता.
मकर :-
कामातील ऊर्जा वाढेल. चिकाटी कमी पडू देऊ नका. सारासार विचाराने उलाढाल करा. प्रेमप्रकरणाला नवीन चैतन्य लाभेल. एकमेकांचे विचार जाणून घ्याल.
कुंभ :-
घरात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक सुखसोईंकडे विशेष लक्ष द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मानसिक आनंदाचा दिवस.
मीन :-
प्रवासाची आवड भागवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाद्य शिकायला सुरवात करावी. जवळच्या मित्र मंडळींमध्ये दिवस घालवाल. गैरसमजाची ठिणगी पडू देऊ नका.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






