पारोळा | प्रतिनिधी :- येथील सेव मुरमुरे विकणारे श्री. बापू भिका भोई रा भोई गल्ली पारोळा हे नगरपालिका चौकात शेव मुरमुरे विकत असतांना फिर्यादीचे लक्ष नसताना कॅरी बॅग मध्ये ठेवलेले 8000/- रोख रुपये चोरून नेले, फिर्यादीत लक्षात येताच फिर्यादी पारोळा पोलीस स्टेशनला आले व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना भेटून हकीकत सांगितली असता तपासाची तात्काळ चक्र फिरविले असता पो कॉ किशोर भोई,पो कॉ अभिजित पाटील,पो राहुल पाटील,पो कॉ आशिष गायकवाड,पो कॉ हेमचंद्र साबे, यांनी
तात्काळ बातमीदार लाऊन मिळालेले खात्रीशीर बातमी वरून संशयीत राहुल धर्मा भोई मराठे गल्ली पारोळा यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करता काही एक सांगत नव्हता,त्यास विश्वासात घेऊन सखोल विचारपूस करता रोख 8000/- रुपये चोरी केलेच कबूल केलेने नमूद आरोपीस अटक केली,अटक मुदतीत आरोपीने दिलेले कबुली जबाबावरून घरात कपातील डब्यात ठेवलेले 7000/- रुपये दोन पंचासमक्ष जप्त केले आहे,
व एक हजार रुपये खर्च केलेच सांगितलेले नमूद आरोपीस मा JMFC श्री. काझी साहेब यांचे समक्ष हजर केले असता मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड देण्यात आला आहे,पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना योगेश जाधव करीत आहे.
हे पण वाचा
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






