एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- रवंजा बुद्रुक (ता.एरंडोल) मोटारसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत अठरा वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.हाणामारीत जखमी झालेल्या एकावर जळगाव येथे उपचार सुरु असून एका जखमीसह चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.रवंजा बुद्रुक येथे तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.याबाबत दोन्ही गटाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी,की रवंजा बुद्रुक येथे मोटार सायकलचा कट लागल्याच्या कारणावरून लक्ष्मण माळी आणि सुभाष कोळी यांच्या परिवारात वाद होऊन हाणामारी झाली.
यामध्ये नामदेव माळी या अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर सुनील माळी आणि लक्ष्मण माळी यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्यामुळे गंभीर जखमी झाले.लक्ष्मण गणपत माळी यांनी दिलेल्या तक्रारीत
म्हटले आहे,की काल (ता.६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गावातील नामदेव उर्फ रावण अशोक कोळी हा घरी आला आणि तुमचा मुलगा कुणाल माळी याने
अंगणवाडीजवळ शिवीगाळ केली असून त्यास समजाऊन सांगा असे सांगितले.लक्ष्मण माळी यांनी मुलगा कुणाल यास शिवीगाळ का केली असे विचारले असता नामदेव कोळी यास मला शिवीगाळ करीत असल्याचे वाटले.
त्यानंतर नामदेव कोळी यांनी पुन्हा शिवीगाळ केली आणि कुणाल माळी यास पाहून घेण्याची धमकी दिली.आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास लक्ष्मण माळी हे बसस्थानकाजवळ उभे होते तर त्यांचा भाऊ सुनील माळी हे बस स्थानकाजवळ स्वत:च्या रिक्षाजवळ उभे होते. त्याच वेळी नामदेव कोळी आणि अक्षय कोळी हे तेथे आले आणि सुनील माळी यांच्याशी वाद घालू लागले.दोघांमधील वाड विकोपाला गेल्यामुळे संतप्त झालेल्या नामदेव कोळी याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने सुनील माळी याच्या पोटात वार केला.लक्ष्मण माळी हे भावाला वाचवण्यासाठी गेले असता त्यांच्या हातावर देखील वार करून जखमी केले.
त्यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली असता नामदेव कोळी याने हातातील चाकू त्याच ठिकाणी
फेकून शेताकडे पळून गेला.ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून पकडले व मारहाण केली.ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात घटनेची माहिती दिली.याबाबत लक्ष्मण
माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नामदेव कोळी आणि अक्षय कोळी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुभाष कोळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की लक्ष्मण माळी हे त्यांचे मुळे आनंदा माळी आणि चेतन माळी यांचेसह आज सकाळी घरी आले आणि तुझ्या भावाच्या मोटार सायकलचा कट मारल्याचे सांगून वाद घालू लागले आणि नामदेव कोळी कोठे आहे याबाबत विचारणा करू लागले..
त्यावेळी तिघांच्या हातात लोखंडी angal व लोखंडी पाईप होते.सकाळी आठ वाजेच्या सुमारास लक्ष्मण माळी,आनंदा माळी व चेतन माळी बसस्थानकाजवळ भाऊ नामदेव कोळी यांच्यात वाड झाला त्यावेळी नामदेव कोळी याने लक्ष्मण माळी व सुनील माळी यांचेवर चाकूने हल्ला केला आणि शेताकडे पळून गेला.त्यावेळी भय्या कोळी याने त्यास पकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणले.त्यावेळी लक्ष्मण माळी,राजू सुकदेव माळी, सुकलाल माळी यांनी नामदेव यास मारहाण केली तर राजू सुकदेव माळी याने दगड उचलून नामदेव याच्या डोक्यात मारला.तसेच भय्या सोनवणे याने नामदेव कोळी याची मोटार सायकल पेटवून दिली.
नामदेवचे वडील अशोक कोळी,भाऊ प्रवीण कोळी,सुभाष कोळी यांनी नामदेव यास जळगाव येथे शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी करून तो मयत झाल्याचे सांगितले.याबाबत सुभाष कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून लक्ष्मण गणपत माळी,राजू सुकदेव माळी,सुकलाल माळी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.याबाबत पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- Video: खळबळजनक! साखरपुडा सुरू वधू-वर दोघेही स्टेजवर तेवढ्यात एक युवती आली तिने नवरीला मिठी मारली अन् म्हणाली….. काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ
- मी’न्याय कुणाकडे मागायचा’ माझ्या पत्नीने सोडचिठ्ठी न देता केला दुसरा विवाह; म्हणत पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वतःला पेटवून घेतलं.
- 52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.
- दोघांच्या प्रेमात ५ वर्षाच्या मुलगा होता अडथळा.! निर्दयी आई समोर प्रियकराने केली चिमुल्याची हत्या, कपड्यात बांधून मृतदेह फेकला नदीत.
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…