सोने लूट प्रकरणात अजून दोन आरोपींना अटक या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या आठ झाली.

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल :- माळ पिंप्री ता तालुका एरंडोल येथील सोन्या-चांदीचे व्यापाऱ्यावर पिस्तुलचा धाक दाखवून तसेच चाकूने वार करून त्यांच्या जवळून सोने-चांदीच्या ऐवज व रोख रकमेची लूट करणाऱ्या आरोपात यापूर्वी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आज एरंडोल पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन संशयित आरोपींना रवंजे ता एरंडोल येथून अटक करण्यात आली.
या रस्ता लूट प्रकरणात आतापर्यंत आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.


यापूर्वी अटक करण्यात आलेल्या सहा संशयित आरोपींना दहा दिवसाच्या पोलिस कस्टडी दरम्यान त्यांचे जवळून तीन किलो चांदी 98 ग्रॅम सोने व बारा हजार रुपये रोख असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की माळ पिंप्री ता. एरंडोल येथील सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते हे रवंजे येथून दुकान बंद करून घराकडे येत असताना विखरण चोरटक्की रस्त्यावर भर दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्याजवळ असलेला सुमारे नऊ लाख रुपयाच्या सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. भर दुपारी रस्ता लूट झाल्यामुळे पोलीस प्रशासन हादरले होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव व कर्मचारी यांनी तपासाची चक्रे फिरवून चोवीस तासांतच दिगंबर उर्फ डीग्या रविंद्र सोनवणे, विशाल अरुण सपकाळे, विशाल लालचंद हरदे, संदीप राजू कोळी चार संशयितांना ताब्यात घेतले होते. तर त्यांचे दोन साथीदार फरार झाले होते.


दिनांक 22 फेब्रुवारी रात्री गुन्ह्यातील दोन संशयित आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे, व आकाश मुरलीधर सपकाळे यांना अटक करण्यात आली होती या सर्व सहा आरोपींना आज न्यायालयिन कोठडी मिळाल्यामुळे सहा आरोपींना आज धुळे येथिल सब जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
या रस्ता लूट प्रकरणात आरोपींना रवंजे येथून राजेंद्र विसपुते यांच्या विषयी पूर्ण माहिती व लोकेशन देणारे दोन आरोपी सागर शांताराम नन्नवरे वय 21 वर्षे राहणार मढी चौक पिंप्राळा जळगाव हल्ली मुक्काम रवंजे, दीपक ऊर्फ बंटी जोसेफ बोरसे वय 24 वर्षे रा रवंजे खुर्द दोन आरोपींना आज पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली राजेश पाटील,अनिल पाटील, पंकज पाटील, मिलिंद कुमावत, अकील मुजावर, विकास खैरनार यांनी आज सायंकाळी रवंजे येथून गुप्त माहिती वरून अटक करण्यात आली. या रस्ता लूट प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टीम झुंजार