एरंडोल :- येथील मोबाईल विक्रीचे दुकान फोडून त्यातील मोबाईल चोरी करणा-या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. टिकाराम कोमल मोरे (रा. केवडीपुरा, एरंडोल) आणि पंकज मंगल वाघ (रा.हिंगोणा ता.धरणगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दुकानातून चोरी झालेल्या मोबाईलपैकी 70 हजार 697 रुपये किमतीचे नऊ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
एरंडोल शहरातील म्हसावद रोडवरील शेतकीसंघ कॉम्प्लेक्स मधील हरीओम ईटरप्रायजेस नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान फोडून त्यातील 19 मोबाईल व 3 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते. या घटने प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी झालेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक व मोबाईलमधील क्रमांकाचे लोकेशन मिळवून पुढील तपासासह कारवाईला स्थानिक गुन्हे शाखेने वेग दिला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजन पाटील यांच्या पथकाने एरंडोल शहराच्या केवडीपुरा भागातून टिकाराम कोमल मोरे, धरणगाव तालुक्यातील हिंगोणा येथून पंकज मंगल वाघ आणि कासोदा येथील एक जण अशा तिघांकडून चोरी झालेल्या मोबाईलपैकी अंदाजे 70 हजार 697 रुपये किमतीचे नऊ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
टिकाराम मोरे आणि पंकज वाघ अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. टिकाराम सोनवणे याने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा साथीदार प्रविण रविंद्र बागुल (रा. केवडीपुरा एरंडोल) याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले. मात्र पोलिस कारवाईचा सुगावा लागल्याने तो फरार होण्यात यशस्वी झाला. पो.नि. किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, संदिप सावळे, महेश महाजन, पो.ना. नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, पो. कॉ. लोकेश माळी, महीला पो.ना. उपाली खरे, चालक हे.कॉ. भरत पाटील व पो.कॉ. प्रमोद ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.
अटकेतील दोघांना एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शरद बागल करत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या टिकाराम कोमल मोरे, व पंकज मंगल वाघ या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीश भक्ती तळेकर यांनी दोघ आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली .
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






