निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- येथील गावातील लोकसंख्या अंदाजे वीस ते पंचवीस हजार इतकी असून निंभोरा स्टेशन गावाला लागून असलेली पंचक्रोशीतील जवळपास 20 ते 22 खेडी आहेत या गावातील व्यापार शेती, शिक्षण केळी निर्यात यासाठी या गावात सततचा संपर्क येत असतो रावेर तालुक्यातील सुमारे तिसरा हिस्सा केली उत्पादन निंभोरा रेल्वे स्टेशन वरून निर्यात होते मात्र येथे कोरोना काळापासून बंद झालेल्या पठाणकोट एक्सप्रेस ला थांबा नसल्याने व्यापारी व नागरिकांची गैरसोय होते तरी या गाडीला येथे थांबा द्यावा अशी मागणी परिसरातून बहुतेक वेळा करण्यात आली मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करत त्यांचे प्रयत्नही अपुरे पडत आहे.
निंभोरा गावात राष्ट्रीयकृत बँका, पोलीस ठाणे, महावितरण, व्यापार, शिक्षण तसेच वैद्यकीय सेवा आहेत मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्या व त्यातही ब्रिटिश काळापासून थांबत असलेली पठाणकोट एक्सप्रेस कोरोना काळात बंद केल्यामुळे प्रवाशांची अतिशय कुचंबना होत आहे त्यामुळे कामाचा कोळंबा होतो चांगल्या व गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचार सेवा या बाहेरगावी होऊ शकत नाही गरिबांना भाडोत्री वाहने परवडत नाही. तसेच प्रवाशांना रावेर व सावदा येथे जावे लागते तरी एकमेव थांबणारी पठाणकोट एक्सप्रेस येथे थांबणे आवश्यक आहे .
या संदर्भात मागे ग्रामपंचायत शिष्टमंडळ खासदार रक्षाताई खडसे रेल्वे डी एम आर भुसावळ यांच्याकडे पाठपुरावा करूनही पठाणकोट एक्सप्रेस थांबत नसल्याने प्रवासी जनता हवालदिल झाली असून यापुढे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






