पाचोरा- येथील तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने दि.15 जुलै 2023 रोजी शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे न्यायाधीश मा.श्री. जी. बी.औंधकर यांच्या अध्यक्षतेत गिरणाई शिक्षण संस्था संचलित विविध शाळांमधील कुमारवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना POCSO कायदा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी न्यायाधीश एल. व्ही श्रीखंडे, गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. तात्यासाहेब पंडितराव शिंदे ,सेक्रेटरी मा. जे. डी.काटकर , सह सचिव मा. शिवाजी शिंदे सर तसेच गिरणाई शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मार्गदर्शन शिबिराच्या प्रारंभी गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे उपस्थित न्यायमूर्तींना फुल झाडांची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरात मोफत कायदा सहायता विषयी जेष्ठ विधिज्ञ मा.जे.डी दादा काटकर यांनी मार्गदर्शन केले. शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती सविता पाटील यांनी बालकांचे हक्क व अधिकार या विषयी तर न्यायाधीश सौ.एम.जी हिवराळे मॅडम यांनी पोक्सो कायदा इतिहास/ ऑब्जेक्ट्स/ प्रियंबल विषयी सखोल मार्गदर्शन केले. मा. सौ. ॲड .भाग्यश्री महाजन यांनी POCSO कायद्यातील तरतूदि तसेच सौ. एम.डी .जाधव मॅडम यांनी सध्याचे समाज व्यवस्था व POCSO कायद्याविषयी याबाबत वस्तुस्थितीदर्शक आढावा सादर केला.
अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश मा. श्री .जी .बी. औंधकर साहेबांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन लाभले.
“परस्त्री मातेसमान”- ही भावना वैश्विक समाजात रुजली असती तर, पोक्सो कायदा निर्माण झाला नसता, असे सांगत उपस्थित मुला- मुलींनी आपापल्या भावाला आणि बहिणीला सुसंस्कार, व आदर्श आचरणाची शिकवण द्यावी असा संदेश त्यांनी दिला. तसेच मुलींनी पुस्तकी ज्ञानासोबतच स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत, मुला -मुलींनी सार्वजनिक जीवनात स्पर्शज्ञान, स्वसंरक्षण, शक्ती व युक्ती आणि स्वसंरक्षण याबाबत सदैव सतर्क रहावे असा सल्ला न्यायाधीश औंधकर यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – कनिष्ठ लिपिक श्री.अनिल शिंदे यांनी केले, तर प्रास्ताविक- वकील संघाचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील सरांनी केले. शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला गिरणाई शिक्षण संस्था संचलित पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पी.पी. शिंदे (आदर्श) माध्यमिक विद्यालय व शिंदे इंटरनॅशनल स्कूल मधील कुमारवयीन मुले -मुली, तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी आणि वकील संघाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित वकील बांधव
ॲड. अनुराग काटकर, ॲड. राजेंद्र परदेशी, ॲड.अनिल पाटील, ॲड. वहाब देशमुख, अँड संजीव नैनाव, ॲड. कैलास सोनवणे, ॲड. राहुल पाटील, ॲड.अविनाश सुतार, ॲड.रणसिंग राजपूत, ॲड. डी. आर. दादा पाटील, ॲड.एस. पी. आण्णा पाटील, ॲड. प्रशांत नागणे, ॲड. स्वप्निल पाटील, ॲड.भाग्यश्री महाजन, ॲड. ज्योती पाटील, ॲड. माधुरी जाधव, ॲड. कविता मासरे,ॲड. मीनाकुमारी सोनवणे, ॲड. चंचल पाटील, ॲड. आर. के. माने, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. सचिन देशपांडे व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.