भूसावळ :- शहरातील एका दाखल असलेल्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह रायटर तुषार पाटील व खाजगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला यांना धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली.
एसीबीच्या या कारवाईने जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा खाकीला डागाळली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, काही दिवसांपूर्वी बायोडिझेलची वाहतूक करणारा टँकर बाजारपेठ पोलिसांकडे कारवाईसाठी दिला होता मात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 15 लाखांची मागणी करण्यात आलीव सुरूवातीला तीन लाख रुपये घेवून नंतर पुन्हा 12 लाख रुपये मागण्यात आल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. ऋषी शुक्ला व तुषार पाटील यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली तर पोलीस निरीक्षकांसाठी लाच मागण्यात आल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागावाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील, पो. हवा राजन कदम, पो कॉ. संतोष पावरा, पो.कॉ.रामदास बारेला, पो. हवा चालक सुधीर मोरे
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा