मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बेंचमार्क निर्देशांक १९ जुलै रोजी निफ्टी १९,८५० च्या आसपास वाढले आणि सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली.
बाजार बंद होताना, सेन्सेक्स ३०२.३० अंकांनी किंवा ०.४५% वाढून ६७,०९७.४४ वर आणि निफ्टी ८३.९० अंकांनी किंवा ०.४२ टक्क्यांनी वाढून १९,८३३.१५ वर होता. सुमारे १,९६१ शेअर्स वाढले तर १,३६० शेअर्स घसरले आणि ११९ शेअर्स अपरिवर्तित राहीले.
निफ्टीमध्ये सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये एनटीपीसी, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फिनसर्व्ह यांचा समावेश होता, तर तोट्यात हिंदाल्को इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, टीसीएस आणि मारुती सुझुकी यांचा समावेश होता.
पीएसयु बँक २ टक्क्यांनी, तर ऊर्जा, आरोग्य सेवा आणि तेल आणि वायू प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढल्याने सर्व क्षेत्र हिरव्या रंगात रंगले. बीएसई मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.६ टक्क्यांनी वाढले.
भारतीय रुपया ८२.०४ मागील बंदच्या तुलनेत प्रति डॉलर ८२.०९ वर किरकोळ कमी झाला.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन