अखेर पारोळा शहराचा ४५ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रशासकीय मान्यता आदेश प्राप्त – आमदार चिमणराव पाटील

Spread the love

झुंजार पारोळा प्रतिनिधी

पारोळा – शहरातील अत्यंत महत्वाचा व ज्वलंत विषय म्हणजे पाणीप्रश्न. गेल्या कित्तेक दशकापासून पाणीप्रश्न हा प्रलंबित असल्याने पाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना मोठ्या प्रमाणावर शहरवासियांना तोंड द्यावे लागत होते. गेल्या कित्तेक दशकापासून ८ ते १० दिवसांआड पाणी मिळणे, वेळेवर पाणी न येणे, वारंवार तांत्रिक अडचणींमुळे पाणी उशिराने मिळणे, गडूळ पाणी, अशुद्ध पाण्यामुळे वाढती रोगराई याने शहर वासीय चांगलेच हैराण झाले होते. शहरवासियांनी यासाठी अनेकदा हंडा मोर्चा, आंदोलने देखील केली मात्र त्याचे काहीही फलित शहर वासियांना प्राप्त झाले नाही. आजपावेतो शहर वासीय या अडचणींना सामोरेच जात आहेत. पाणी प्रश्नावर यापुर्वी अनेकांनी घोषणा केल्या, आश्वासने दिली मात्र प्रत्यक्ष कुणीच या विषयावर लक्ष दिले नाही. तसेच याअगोदर देखील हा प्रस्ताव शासन दरबारी गेला. मात्र त्यात अनेक त्रुट्या, अपुर्ण माहीती यामुळे त्यास मंजुरीच देण्यात आली नाही. या सर्वच अडचणींतून शहरवासीयांना मुक्त करावे व शहरात शिरपूर पॅटर्न राबवून शुध्द पाणी व वेळेवर पाणीपुरवठा उपलब्ध करून शहराचा कायमचा पाणीप्रश्न दूर व्हावा हि दूरदृष्टी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांची आमदार झाल्याचा पहिल्या दिवसापासूनच होती.

त्याच पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजना मंजुर होण्यासाठी लागणारा विलंब, त्यांमधील त्रुटी, उद्भवणाऱ्या अडचणी याची सविस्तर माहिती आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी जाणून घेतली. यानंतर या सर्वच त्रुटी व अडचणींचा पूर्ततेसाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी तातडीने समन्वय समितीची बैठक आयोजित केली व या बैठकीत पाणी पुरवठा योजना मंजुरीसाठी उद्भवणाऱ्या त्रुटी व अडचणींचा पूर्ततेसाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेत तातडीने पूर्तता पूर्ण केली व सदरील परिपूर्ण प्रस्ताव आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी शासन दरबारी सादर करून राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचेकडे पत्रव्यवहार करून आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी या योजनेमुळे शहरवासियांचा कायमचाच पाणीप्रश्न सुटणार असल्याचे मा.मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. तदनंतर या प्रस्तावाची राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी तातडीने दखल घेत आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा उपस्थितीत व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव म.महेशजी पाठक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा दालनात दिनांक – २५ फेब्रुवारी २०२२ रोजी तातडीची प्रकल्प समितीची बैठक आयोजित करून योजनेस मंजुरी देण्याचा सुचना दिल्या. याबैठकीत एकमुखाने पारोळा शहराचा ४५ कोटी रूपयाचा पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली व आज दिनांक – ०४ मार्च २०२२ रोजी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांना आपल्या शासकीय दालनात बोलावून पारोळा शहरासाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रशासकीय मान्यता आदेश मा.मंत्रीमहोदयांनी आपल्या शुभहस्ते आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांना सुपुर्द करण्यात आला.

या योजनेचा मंजुरीमुळे पारोळा शहराचा कायमचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने या निर्णयामुळे शहरातील जनमानसात आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून शहर वासियांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे मनस्वी आभार मानले आहेत. तसेच या मंजुरीच्या अनुषंगाने आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील यांनी मतदारसंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब व राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचासह पारोळा नगरपरिषद मुख्याधिकारी ते प्रधान सचिवापर्यंत ज्या-ज्या अधिकारी कर्मचारी यांनी वेळोवेळी सहकार्य केले त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच माझे भाग्य कि हे पुंण्याचे काम माझ्या वाटेला आले व शहरवासियांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी एक भाग बनलो त्याचा मला मनस्वी आनंद असल्याचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.या सर्वच अडचणींतून शहरवासीयांना मुक्त करावे व शहरात शिरपूर पॅटर्न राबवून शुध्द पाणी व वेळेवर पाणीपुरवठा उपलब्ध करून शहराचा कायमचा पाणीप्रश्न दूर व्हावा हि दूरदृष्टी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांची आमदार झाल्याचा पहिल्या दिवसापासूनच होती. त्याच पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजना मंजुर होण्यासाठी लागणारा विलंब, त्यांमधील त्रुटी, उद्भवणाऱ्या अडचणी याची सविस्तर माहिती आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी जाणून घेतली. यानंतर या सर्वच त्रुटी व अडचणींचा पूर्ततेसाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी तातडीने समन्वय समितीची बैठक आयोजित केली व या बैठकीत पाणी पुरवठा योजना मंजुरीसाठी उद्भवणाऱ्या त्रुटी व अडचणींचा पूर्ततेसाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेत तातडीने पूर्तता पूर्ण केली व सदरील परिपूर्ण प्रस्ताव आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी शासन दरबारी सादर करून राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचेकडे पत्रव्यवहार करून आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी या योजनेमुळे शहरवासियांचा कायमचाच पाणीप्रश्न सुटणार असल्याचे मा.मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. तदनंतर या प्रस्तावाची राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी तातडीने दखल घेत आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा उपस्थितीत व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव म.महेशजी पाठक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा दालनात दिनांक – २५ फेब्रुवारी २०२२ रोजी तातडीची प्रकल्प समितीची बैठक आयोजित करून योजनेस मंजुरी देण्याचा सुचना दिल्या. याबैठकीत एकमुखाने पारोळा शहराचा ४५ कोटी रूपयाचा पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली व आज दिनांक – ०४ मार्च २०२२ रोजी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांना आपल्या शासकीय दालनात बोलावून पारोळा शहरासाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रशासकीय मान्यता आदेश मा.मंत्रीमहोदयांनी आपल्या शुभहस्ते आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांना सुपुर्द करण्यात आला. या योजनेचा मंजुरीमुळे पारोळा शहराचा कायमचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने या निर्णयामुळे शहरातील जनमानसात आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून शहर वासियांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे मनस्वी आभार मानले आहेत. तसेच या मंजुरीच्या अनुषंगाने आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील यांनी मतदारसंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब व राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचासह पारोळा नगरपरिषद मुख्याधिकारी ते प्रधान सचिवापर्यंत ज्या-ज्या अधिकारी कर्मचारी यांनी वेळोवेळी सहकार्य केले त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच माझे भाग्य कि हे पुंण्याचे काम माझ्या वाटेला आले व शहरवासियांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी एक भाग बनलो त्याचा मला मनस्वी आनंद असल्याचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.

टीम झुंजार