Viral Video नवी दिल्ली: एका अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून तिला मारहाण केल्याचा आरोप असणाऱ्या दांपत्याला संतापलेल्या जमावाने चोप दिल्याची घटना राजधानीत घडली आहे.
या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये एका महिला पायलट व तिच्या पतीची सर्वांसमोर धुलाई होत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला रोखले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
दिल्लीतील द्वारका परिसरात हा प्रकार घडला. १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीला टॉर्चर केल्याच्या आरोपाखाली महिला पायलट आणि तिच्या पतीला जमावाने मारहाण केली. ही मुलगी त्यांच्या घरी काम करत होताी, मात्र तिच्यावर चोरीचा आळ घेऊन या दांपत्याने तिला टॉर्चर केल्याचा, तिचा छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या अत्याचारानंतर पीडित मुलगी तिथून पळून गेली आणि तिच्या कुटुंबियांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
दिल्ली पोलिसांच्या सांगण्यानुसार, या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, आरोपी पती-पत्नीवर कलम 323, 324, 342 आणि बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमकं काय झालं ?
द्वारका येथील डीसीपी हर्षवर्धन यांनी सांगितले की, या (अत्याचार) प्रकरणाची तक्रार मिळाल्याननंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो, तेथे १० वर्षांची मुलगी घरकामासाठी मदतनीस म्हणून होती. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता तिच्या अंगावर अनेक जखमा आणि भाजल्याच्या खुणा आढळून आल्या. त्याच आधारे केस दाखल करण्यात आली असून त्या दांपत्याला अटक करण्यात आली आहे. त्या अल्पवयीन मुलीचे काऊन्सिलिंग करण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले. तिने
या दांपत्याने दोन महिन्यांपूर्वी या मुलीला कामावर ठेवले होते. कुटुंबियांना तिच्या अंगावर जखमा दिसताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मुलीच्या नातेवाईकांनी व इतर लोकांनी पती-पत्नीला चोप देण्यास सुरूवात केल्याचे समजते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






