Viral Video : – महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी तर दरड देखील कोसळत आहे. त्यामुळे हा पावसाळा सर्वांसाठीच संकट घेऊन आला आहे. दिल्ली आणि हिमाचलमध्ये तर अत्यंत वाईट परिस्थीती उद्भवली आहे.
हिमाचलमधील पुराचे अनेक व्हिडीओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील जे मन हेलावून टाकणारे आहेत.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आला आहे. या व्हिडीओतील दृश्य खूपच वेदनादायी आहे. मेल्यानंतर देखील मृत शरीराला अग्नी नशिब होत नाही हे फारच दुर्दैवी आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीची जळती चिता पाण्यात वाहून जाताना पूर्णपणे दिसत आहे. बहुतांश ठिकाणी नदी किनारी मृतांना अग्नी दिली जाते.
असंच एका व्यक्तीच्या मृतदेहाला नदीच्या काठी अग्नी दिली होती. परंतु तेव्हाच नदीला अचानक पुर आला, ज्यामुळे चिता संपूर्ण जळण्याआधी पाण्यातून वाहून गेली. त्यासोबत मृतदेह देखील वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर हळहळ व्यक्त केली आहे. तसेच मृतदेहाला अग्नि नशिब झाली नाही.
असं म्हणत काही युजर्सने श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. पण तो हिमाचलमधीलच असल्याचा अंदाजा लावला जात आहे. @IAbhay_Pratap नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.
हे पण वाचा
- VIDEO : चालत्या बसमध्ये चालकास आला हृदयविकाराच्या झटका, कंडक्टरच्या बुद्धिमत्तेमुळे ३५ प्रवाशांचे वाचले प्राण, पण दुर्दैवाने…… पहा व्हिडिओ.
- नवरीचे एकाशी प्रेमसंबंध, प्रियकराने केली नवरदेवाशी मैत्री, फटाके आणण्याच्या बहाण्याने घेऊन गेला, अन् नवरदेवाची केली निर्घृण हत्या,मृतदेह फेकला विहिरीत.
- एरंडोल येथे किरकोळ कारणावरून मारहाण केलेल्या ३४ वर्षीय युवकाचा मृत्यू. पाच संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल.
- डिव्हायडरवर धडकल्याने पहिला किरकोळ अपघात मधून वाचले, गाडीतून खाली उतरतांच भरधाव ट्रकने चिरडले 6 जणांचा जागीच मृत्यू, पहा CCTV व्हिडिओ
- Viral Video:गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं अन् बॉईज हॉस्टेलमध्ये आणलं;पण ‘ती किंचाळली अन् तो फसला’ पुढे काय झालं,पहा व्हिडिओ.