पारोळा:- लग्न जुळवून देण्याच्या आमिषाने फसवणुक केल्या प्रकरणी आरोपी कडून 40 हजार रुपये हस्तगत करून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तक्रारदार महिलेस परत दिले. या बाबत माहिती अशी की श्रीमती मालुबाई सुभाष पाटील वय 55 वर्ष शेतीकाम र हिरापुर ता पारोळा यांनी त्यांचा मुलगा योगेश याचे लग्न करणे असलेने त्यास चांगली मुलगी पाहून लग्न लाऊन देतो असे फिर्यादीस आरोपी नामे 1,) जितेंद्र ज्ञानेश्वर राघार्टे वय 34वर्ष रा भवरी ता मौदा जि नागपूर 2,)अनिल संजय पाटिल वय 28वर्ष रा येकोडा ता तिरोडा जी गोंदिया
यांनी आमिष दाखवून आरोपींनी दोन लाख चाळीस हजार रुपये घेऊन मुलगी न दाखविता फसवणूक केली फिर्यादीचे फिर्याद वरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असता पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली हे कॉ विनोद साळी,पो ना प्रवीण पाटील यांचे पथक नागपूर ,गोंदिया येथे पाठवून वरील दोन्ही आरोपींना अटक केली होती व पोलीस कस्टडी रिमांड घेऊन रोख चाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले होते .
मा पारोळा येथील न्यायाधीश श्री काझी साहेबांचे आदेशावरून फिर्यादी यांना रोख चाळीस हजार रुपये परत देण्याचा आदेश झालेने फिर्यादी श्रीमती मालुबाई यांना पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी रोख चाळीस हजार रुपये परत दिले आहे.फिर्यादीस रोख रुपये पोलिसांनी परत दीलेने पोलिसांचे आभार मानले आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम