प्रतिनिधी l अमळनेर :- कुरकुरे घेण्यासाठी पैसे देऊन उर्वरित पैसे परत देण्यासाठी घरात आलेल्या बालिकेवर अत्याचार करण्याऱ्या एका ५० वर्षीय इसमास अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपी संतोष मुरलीधर पाटील वय ५० रा.देवगाव ता.पारोळा याने २ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी व तिची मैत्रीण ह्या दोन्ही घरात अभ्यास करीत असतांना आरोपीने पीडित मुलीला बोलावून तिला दहा रुपये दिले व दुकानावरून कुरकरे घेऊन ये असे सांगितले.
पीडित मुलगी दुकानावरून एक कुरकुरे घेऊन आली व उर्वरीत पाच रुपये देण्यासाठी आरोपीकडे गेली असता आरोपीने पीडित बलिकेला घरात बोलावून घेतले व तुझे सर्व कपडे काढून तू माझ्या जवळ झोप असे सांगत हात पकडून तिला ओढू लागला.मात्र पीडित मुलीने त्याच्या हाताला चावा घेतला व त्याच्या घरातून बाहेर पळ काढला.याबाबत तिने घरी असलेल्या आजी जवळ सर्व हकीकत सांगितली. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्यात ८ साक्षीदार तपासण्यात आले होते.त्यात पीडित मुलगी,सरकारी पंच,आजी,दुकानदार व शेजारी व तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख यांची साक्ष महत्वाची ठरवत जिल्हा न्यायाधीश वर्ग १ एस बी गायधनी यांनी आरोपीस भादवी कलम ३५४ मध्ये पाच वर्षे कारावास व ५०० रुपये दंड दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा,३५४(अ),लैंगिक गुन्हा बाल संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८ व १२ मध्ये तीन वर्षे शिक्षा व ३०० रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा
तसेच अनुसूचित जाती जमाती(अत्याचारास प्रतिबंध सुधारणा)अधिनियम २०१५ चे कलम ३(डब्लू)(i) नुसार ५ वर्ष शिक्षा व ५०० रुपये दंड दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील किशोर रघुनाथ बागुल यांनी युक्तिवाद केला.पैरवी अधिकारी उदयसिंह साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील,नीतीन कापडणे,राहुल रणधीर यांनी काम पाहिले.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






