आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघातील ८१ कि.मी.च्या शेत पाणंद रस्त्यांसाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रूपये मंजुर

Spread the love

झुंजार न्यूज

पारोळा । प्रतिनीधी

पारोळा – आमदार चिमणराव पाटील यांनी शेतकऱ्यांचा विविध मागण्यांवर व समस्यांवर वेळोवेळी न्याय देण्याची भुमिका मांडली आहे. मग त्यात अतिवृष्टी, पिकाला हमीभाव यांसह विविध शेती विषयांवर सतत शेतकऱ्यांची बाजु मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आठवड्याभरापुर्वीच श्रीक्षेत्र नागेश्वर मंदीर विकासासाठी ३ कोटी तसेच २ दिवसाअगोदरच पारोळा शहराचा पाणीपुरवठा योजनेसाठी ४५ कोटी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आणि आज पुन्हा शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा विषयासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या पाठपुराव्याने एरंडोल विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा दळणवळणासाठी शेतरस्त्यांची दुरूस्ती व्हावी यासाठी मोठी मागणी मतदारसंघातील शेतकऱ्यांमार्फत होत होती. याची आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी त्वरीत दखल घेत शेतरस्त्यांच्या दुरूस्ती साठी पाठपुरावा सुरू केला. त्याचअनुषंगाने आज शासनाच्या नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) कडून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ शेतरस्त्यांचा कामासाठी प्रत्येकी १ कि.मी.साठी २५ लक्ष रूपये असे एकुण २० कोटी रूपयांचा कामांना मंजुरी देण्यात आली. आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी व इतर सुविधांसाठी शेती क्षेत्रात मोठी मदत होणार आहे. या रस्त्यांचा मंजुरीमुळे शेतकऱ्यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे आभार मानले असुन शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे.

आमदार चिमणराव पाटील हे मतदारसंघातील दुर्लक्षित विषयांवर पाठपुरावा करून त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध होत असल्याने मतदारसंघात सर्वसामान्य नागरीकांसह बळीराजादेखील कौतुक करित आहे.आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघातील ८१ किमी च्या शेत पाणंद रस्त्यांसाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रूपये मंजुर
पारोळा – आमदार चिमणराव पाटील यांनी शेतकऱ्यांचा विविध मागण्यांवर व समस्यांवर वेळोवेळी न्याय देण्याची भुमिका मांडली आहे. मग त्यात अतिवृष्टी, पिकाला हमीभाव यांसह विविध शेती विषयांवर सतत शेतकऱ्यांची बाजु मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आठवड्याभरापुर्वीच श्रीक्षेत्र नागेश्वर मंदीर विकासासाठी ३ कोटी तसेच २ दिवसाअगोदरच पारोळा शहराचा पाणीपुरवठा योजनेसाठी ४५ कोटी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आणि आज पुन्हा शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा विषयासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या पाठपुराव्याने एरंडोल विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा दळणवळणासाठी शेतरस्त्यांची दुरूस्ती व्हावी यासाठी मोठी मागणी मतदारसंघातील शेतकऱ्यांमार्फत होत होती. याची आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी त्वरीत दखल घेत शेतरस्त्यांच्या दुरूस्ती साठी पाठपुरावा सुरू केला. त्याचअनुषंगाने आज शासनाच्या नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) कडून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ शेतरस्त्यांचा कामासाठी प्रत्येकी १ कि.मी.साठी २५ लक्ष रूपये असे एकुण २० कोटी रूपयांचा कामांना मंजुरी देण्यात आली. आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी व इतर सुविधांसाठी शेती क्षेत्रात मोठी मदत होणार आहे.

या रस्त्यांचा मंजुरीमुळे शेतकऱ्यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे आभार मानले असुन शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे. आमदार चिमणराव पाटील हे मतदारसंघातील दुर्लक्षित विषयांवर पाठपुरावा करून त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध होत असल्याने मतदारसंघात सर्वसामान्य नागरीकांसह बळीराजादेखील कौतुक करित आहे.

टीम झुंजार