एरंडोल तहसीलदार कार्यालयावर ७ मार्च ला मोर्चात सहभागी व्हा, शेतकरी सभेत आवाहन

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल

एरंडोल :-येथे अखिल भारतीय किसान सभातर्फे ग्रामपंचायत चौकात शेतकऱ्यांची डॉ राजेंद्र देसले यांचे अध्यक्षते खाली सभा घेण्यात आली .त्या सभेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अम्रुत महाजन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .त्यावेळी स्थानिक शेतकरी प्रतिनिधी कॉम्रेड हिम्मतराव महाजन यांनी प्रास्ताविक भाषनात की , विखरन परिसरातील शेतकऱ्यांची शेती चोरटकी या जंगलाला लागून असून या जंगलातून वन्य पशू व वन्य प्राणी नीलगाई रान डुक्कर हरीण हे रोज कडप्पा कडप्पा ने शेतकऱ्यांची मका, दादर, सूर्यफूल ,आदी पिकांची नासाडी करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना 50 टक्के देखील उत्पन्न येत नाही या प्रश्नांवर शेतकऱ्यांनी संघटित व्हावे असे आवाहन केले

या सभेत मार्गदर्शन करताना कॉम्रेड महाजन यांनी सांगितले की आधीच शेतीमालाला भाव नाही त्यात हे संकट दरवर्षी येते तेव्हा शासनाने या शेतकऱ्यांच्या शेती व वनखाते हद्दी दरम्यान तारेचे कंपाउंड बनवावे व त्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा यासाठी चारा-पाण्याची सोय करावी, आमदार यांनी जिल्हा परिषद सदस्य ही त्यांच्या निधीच्या या कामी उपयोग करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एम एस पी प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी म्हणून गेल्या महिन्यापासून पाठपुरावा सुरू आहे वनखात्याने शेतकऱ्यांनी दिलेला सामायिक अर्जानुसार शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे करावेत ऑनलाइन अर्जाचा घोळ घालून शेतकऱ्यांना चक्कर मध्ये टाकू नये. ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांना मदतीची भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. या सभेमध्ये येत्या 7 मार्च रोजी एरंडोल तहसीलदार व प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात विखरण व परिसरातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र देसले यांनी केले. या सभेला सर्वश्री गंभीर महाजन, छोटू मिस्तरी, नारायण महीराले, आत्माराम अहिरे, रघुनाथ महाजन कैलास रामदास मिस्त्री दिलीप चौधरी किशोर महाजन, इन्धा महाजन ,रावा चौधरी ,रघुनाथ उखर्डू पाटील, रतीलाल महाजन ,महेंद्र महाजन ,सुभाष महाजन, पुरुषोत्तम महाजन, पंडित महाजन ,सोपान देव मिस्तरी, उमराव महाजन, बापू चौधरी शांताराम सपकाळे एकनाथ महाजन, दिलीप चौधरी अनिल महाजन आदी शेतकरी उपस्थित होते ७मार्च चे मोरच्याने शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास एरंडोल चौफुली वर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही या सभेत देणेत आला

टीम झुंजार