नागपूर : प्रेयसी दोन महिन्यांची गर्भवती असतानाच प्रियकराने तिच्याच मैत्रिणीशी सूत जुळवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. हा प्रकार उघडकीस येताच पहिल्या प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गुलशन उर्फ गोल्डी धनराम हरीनखेडे (वय २०, रा. एमआयडीसी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित १७ वर्षीय मुलगी स्विटी (बदललेले नाव) १२ वीची विद्यार्थिनी आहे. तिचे गेल्या १० महिन्यांपूर्वी गुलशनशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली. आरोपी गुलशन हा नळ दुरूस्तीची कामे करतो. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे सुरु झाले. आरोपी गुलशनने स्विटीला वारंवार वेगवेगळी आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने स्विटीला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी बोलावले. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपीने ३० ऑक्टोबर २०२२ ते २६ जुलै २०२३ असे सलग आठ महिने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर आरोपी गुलशन याने स्विटीच्या मैत्रिणीशी संपर्क साधला. तो स्विटी आणि तिच्या मैत्रिणीसोबत दोघींनाही प्रेमसंबंध ठेवायला लागला. तिची मैत्रिणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दरम्यान, स्विटी दोन महिन्यांची गर्भवती झाली. त्यामुळे ती चांगलीच तणावात असताना लग्नासाठी तगादा लावायला लागली. गुलशन तिच्याच मैत्रिणीच्या प्रेमात पडल्याची बाब तिला समजली. प्रेमभंग झाल्यामुळे स्विटीने गुलशनला मैत्रिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत विचारणा केली. त्याने तिच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली. त्यामुळे चिडलेल्या स्विटीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आरोपी गुलशनविरुद्ध तक्रार दिली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी गुलशनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






