Viral Video मुंबई:- एनसीसी कॅडेटसला सीनिअर कॅडेट्सकडून काठीने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ठाणे येथील जोशी-बेडेकर कॉलेजातील हा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे.हा व्हिडिओ पाहून विद्यार्थ्यांना इतक्या क्रुरतेने मारहाण करत असल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
सिनियर कॅडेट कॅप्टनने एनसीसीच्या विद्यार्थ्यांना भरपावसात काठीने फोडून काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधील हा प्रकार आहे. या विद्यार्थ्यांना घाणेरडे पाणी आणि चिखलात ओणवे उभे राहण्यास सांगितले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांना काठीने फोडून काढले. कॉलेजच्या शेजारील एका इमारतीमधील एका महिलेने हा प्रकार कॅमेरात कैद केला आहे. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते.
या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येत असतात. मात्र ही शिक्षा अशा अमानवी प्रकारची असल्याचे समोर आल्याने खळबळ माजली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसी नकोच असे म्हणताना दिसतायत. मात्र या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचे जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितले आहे.
चौकशीसाठी कमिटी स्थापन
एनसीसीचे हेड जे असे असतात ते सिनियर विद्यार्थीच असतात, ते कोणी शिक्षक नसतात. मात्र, हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार झाला आहे. याने एनसीसीच्या मार्फत जी चांगली काम होतात, ती झाकोळली गेली आहेत. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार आहे. या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही तत्काळ करत आहोत. ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील, त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. आम्हाला येऊन भेटावे एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये, असेही प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी सांगितल आहे.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.