जळगाव:– महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी पाचोरा कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शिवाजी शिंदे यांची तर जिल्हा सहसचिव पदी खडकदेवळा हायस्कूलचे उपशिक्षक चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील शिक्षकांच्या न्याय , हक्क व मागण्यांसोबतच शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेचा गुणात्मक विकास कार्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद कार्यरत आहे. संघटनेच्या आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी जालना येथे झालेल्या बैठकीत जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. शिवाजी भास्कर शिंदे व जिल्हा सहसचिव पदी चंद्रकांत बाजीराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी दिग्रस येथील केंद्रीय विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एकनाथ केराळे यांचे सह संघटनेचे पदाधिकारी व स्वप्निल बागुल सर (पाचोरा) आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.