▪️ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर हल्ला म्हणजे लोकशाही संपुष्टात आणण्याचे कटकारस्थान; राजेंद्र वाघ
धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे सर
धरणगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी अश्लाघ्य भाषेत (वर्णन करता येणार नाही) अश्या शब्दात शिवीगाळ केली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार संदीप महाजन यांना जिवे मारण्याचा कट आखत बेदम मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील पत्रकारांकडून निषेध करून, मारहाण करण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांना सादर करण्यात आले.
याप्रसंगी पत्रकार संघाचे राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, आमच्या कोणत्याही पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही, पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही धरणगाव तालुका पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध करतो. पाचोरा चे आमदार किशोर पाटलांनी अर्वाच्य शिवीगाळ केली व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी संबंधित आरोपीतांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तात्काळ अटकेची कठोर कारवाई करण्यात यावी व निर्भीडपणे पत्रकारिता करीत असताना संदीप महाजन यांच्यावर होत असलेल्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे.
पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे, सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्याच्या कार्यकर्त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे. पत्रकार महाजन यांना न्याय मिळवून देण्याबाबत पूर्ण सहकार्य करावे. तसेच लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये अश्या शब्दात राजेंद्र वाघ यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले. त्याचप्रमाणे पत्रकारांशी वागणूक व्यवस्थित करावी अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी अश्या स्वरूप मागणीचे निवेदन धरणगाव पोलिस निरीक्षक यांच्याकरवी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात राजेंद्र वाघ, विनोद रोकडे, जेष्ठ पत्रकार ॲड. व्ही एस भोलाणे, राजेंद्र रडे, बी आर महाजन, भगीरथ माळी, धर्मराज मोरे, जितेंद्र महाजन, बाळासाहेब जाधव, पी डी पाटील, सतिष शिंदे, विकास पाटील, अविनाश बाविस्कर, धनराज पाटील, आकाश बिवाल, इब्राहिम शेख, निलेश पवार आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……