चिमुकल्या कल्याणीला न्याय द्या; खडकदेवळा येथे निषेध रॅलीने वेधले लक्ष…

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) :- भडगाव तालुक्यातील गोंडगांव येथे गेल्या आठवड्यात कु. कल्याणी संजय पाटील या चिमुकलीवर एका राक्षसी प्रवृत्तीच्या नीच नराधमाने अत्याचार करून तिला निर्घृणपणे ठार मारले होते. या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या संतापजनक व दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून ही घटना मन सुन्न करणारी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. कु.कल्याणीसाठी विविध ठिकाणी मुक मोर्चा व निषेध रॅली चे आयोजन करून तिला न्याय मिळावा म्हणून सर्व समाजातील घटक एकत्र येऊन मारेकऱ्याचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज सर्व समाज एकवटला आहे.

आज पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु.|| येथे माध्यमिक विद्यालय ते बस स्टँड परिसर व दोन्ही गावातून भव्य निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी, गावातील नागरिक, महिला, मुले, मुली, युवा वर्ग, यांनी सहभाग नोंदवून कल्याणीच्या आत्म्यास शांती मिळावी व मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी या निषेध रॅली चे आयोजन केले होते. यावेळी चिमुकल्या कल्याणी विषयी केलेल्या दुष्कृत्याचा संताप व शोक संवेदना माध्यमिक विद्यालयाचे विश्वस्त प्रमोद गरूड, सौ. शिंदे मॅडम, वाचनालयाचे संचालक विश्वास पाटील, सरपंच सुदाम वाघ, पत्रकार व पोलीस पाटील तुकाराम तेली,

शाळेतील विद्यार्थी आणि डॉ. यशवंत पाटील यांनी व्यक्त केल्या. निषेध रॅली चे आयोजन साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, माध्यमिक विद्यालय, खडकदेवळा ग्रामस्थ व डॉ. वाय.पी. युवा फाउंडेशन, यांनी केले होते.यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यानंतर प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, यांना मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी याचे निवेदन देण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार