पारोळा l प्रतिनिधी :- “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान अंतर्गत देवगाव ता.पारोळा येथे आज गावात मशाल रॅलीत सहभाग घेतला त्यांनतर नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे आवारात शहीद जवानांचे स्मारकाचे उदघाटन पारोळा – एरंडोल चे आमदार आबासाहेब चिमणराव रुपचंद पाटील यांचे हस्ते करण्यात आले, मिट्टी को नमन अंतर्गत हातात गावातील शेतांची माती हातात घेऊन शपथ घेण्यात आली. त्यानंतर श्रीराम मंदिरात गावातील शहीद जवानांच्या परिवारातील सदस्यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले
तसेच गावातील जे सैनिक आज सैन्य दलात कार्यरत आहेत सुट्टीवर आल्याने त्यांना देखील सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास पारोळा – एरंडोल चे आमदार आबासाहेब चिमणराव पाटील, पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.डी.शिंदे साहेब, पारोळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पवार साहेब, माध्यमिक शाळा, जि.प.शाळा, मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थीनी
सर्व शिक्षक वृंद, ग्रा.प.कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बाल आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, पोलीस पाटील विश्वास पाटील, बचत गटातील महिला प्रतिनिधी, म.सरपंच समीर पाटील, उपसरपंच नितीन पाटील, ग्रा. पं. सदस्य सचिन पाटील, डॉ.मनीष पाटील, श्रीमती कल्पना पाटील, मा.सरपंच आधार पाटील, ग्रामस्थ चंद्रकांत पाटील, दीपक पाटील, मा.ग्रा.प.सदस्य गोकुळ पाटील, पत्रकार प्रदीप पाटील, डी.के.पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जि.पाटील सर यांनी केले व आभार समीर दादा यांनी मांडले..

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






