नवी मुंबई: हल्ली लग्न जमवण्यासाठी मॅट्रीमोनिअल साईटला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. विवाहेच्छुक तरुण तरुणी मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मॅट्रीमोनिअल साईटवर नाव नोंदवतात.अनेकांना मनाप्रमाणे जोडीदार या साईटवर मिळतोही. पण अनेकदा फसवणुकीच्या घटनाही घडतात. अशीच एक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे.
मॅट्रीमोनिअल साईटवर आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करुन चार महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. हिंमतसिंग चौधरी असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. सध्या तो खारघर येथे राहत होता. याप्रकरणी खारघर पोलिसांनी चौधरी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची चौकशी केली असता त्याने अशा प्रकारे चार महिलांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
‘असा’ उघड झाला बनाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर येथील महिलेने लग्न जुळवण्यासाठी एका मॅट्रीमोनिअल साईटवर नाव नोंदवले होते. तेथे तिची ओळख आरोपीसोबत झाली. आरोपीने आपण आर्मी ऑफिसर असल्याचे महिलेला सांगितले. तसेच अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणे हाताळून मुंबईतील रॉमध्ये पोस्ट केल्याचा दावा केला. यानंतर जानेवारी 2022 मध्ये दोघांनी वांद्रे येथे छोटेखानी समारंभात लग्न केले.
यानंतर दोघे खारघरला एकत्र राहू लागले.लग्नानंतर पती कामावर जात नव्हता. तसेच भारतीय सैन्याच्या सेवेतही त्याने पत्नी म्हणून नोंद केली नाही. यामुळे लग्नानंतर महिलेला पतीच्या नोकरीबद्दल संशय आला. यामुळे तिने पतीची सर्व माहिती काढली. चौकशीत जे समोर आलं त्याने तिला धक्काच बसला. आरोपीने आर्मी ऑफिसर असल्याचे तिला खोटे सांगितले होते. आरोपीने महिलेकडून 3.5 लाख आणि 4 लाखांचे सोन्याचे दागिनेही बळकावले. त्यानंतर त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. यानंतर महिलेने खारघर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






